॥ स्तोत्र मंजूषा ||'स्तोत्र मंजूषा' हा आहे खजिना विविध संस्कृत स्तोत्रे व त्यांचे मराठी गद्य व पद्य समश्लोकी स्वैर अनुवाद यांचा.इथे सापडतील भविकांना, रसिकांना, अभ्यासकांना विविध देवतांची स्तोत्रे, आणि त्यांचे मराठी गद्य व समश्लोकी समवृत्ती पद्य अनुवाद. गणेश, विष्णू, शिव, देवी इत्यादी आराध्य देवता व इतर संकीर्ण स्तोत्रांचे अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून केलेले अनुवाद. उपासकांना आपल्या आराध्य देवतेचे स्तोत्र समजून-उमजून म्हणताना अधिक समाधान लाभेल.मराठी जनांना सुपरिचित अथर्वशीर्ष, रामरक्षा याखेरीज ऋग्वेदातील श्रीसूक्त, पुरुषसूक्त तसेच आ नो भद्रा (स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः) सूक्त यांच्या बरोबरीने दशाननाचे शिवताण्डव स्तोत्र, व्यंकटेश सुप्रभातम् तसेच पं. रामकृष्ण कवींचे अयि गिरिनंदिनि, शिवमहिम्न आणि इतरही अनेक स्तोत्रे. याबरोबरच आद्य शंकराचार्यांची अनेक स्तोत्रे यात समाविष्ट केलेली आहेत.'सिद्धहस्त कवी, भाषांतरकार आणि व्यासंगी विद्वान' असे ज्यांचे वर्णन (कै.) डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी केले आहे, ते 'कालिदासाचे ऋतुसंहार' व 'जयदेवाचे गीतगोविंद' या दोन ग्रंथांचे लेखक धनंजय बोरकर यांचे हे तिसरे पुस्तक संस्कृत अभ्यासकांना तसेच उपासकांना नक्कीच संग्राह्य वाटेल.