भौतिकशास्त्र विषयातील आपल्या प्रचंड व्यासंगाने दबदबा निर्माण केलेले. प्रा. स्टीफन हॉकिंग. कायमचं शारीरिक अपंगत्व असूनही केवळ अचाट बुद्धिमत्ता व अद्वितीय मनोबलाच्या जोरावर संशोधन करणारे अफलातून शास्त्रज्ञ. ही व्यक्ती अपंग आहे. व्हीलचेअरवर बसून असते. साधे शारीरिक धर्मही जिला स्वत: करता येत नाही, त्या व्यक्तीला परमेश्वराने मात्र दिली आहे अचाट बुद्धिमत्ता व अलौंकिक जिद्द. त्यांची जगण्याची जिद्द ही त्यांच्या जीवनाची एक अलौकिक बाजू.हॉकिंग यांना समाजिक मान्यता, अमाप लोकप्रियता संपूर्ण जगात मिळाली ती 1990-2000 च्या दशकात.स्टिफन हॉकिंग यांनी विज्ञानाधारित भरपूर लेखन केलंय. ‘कृष्णविवर’ आणि ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ यावरही यांनी काम केलयं.या पुस्तकात त्यांचे शास्त्रीय संगोपन तर सांगितले आहेत; पण त्यांची शास्त्रीय व्याख्याने, त्यांच्या मुलाखती व इतरांना व्यक्ती म्हणून ते कसे वाटतात याचाही ऊहापोह केला आहे. इ.स. 2000 नंतर परग्रहावरील वस्ती व आपले भविष्यकाळातील जीवन यावर त्यांनी दिलेली भाषणे संक्षेपाने दिली आहेत.स्टीफन हॉकिंग यांच्या एकूणच आयुष्यातून आनंद, जिद्द व जीवनावर प्रेम करण्याचा संदेश मिळतो. विद्यार्थी, तरुण आणि विज्ञानप्रेमी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या या चरित्रात्मक पुस्तकातून आनंद मिळेल यात शंका नाही.