वर्तमान शहरी जीवनातील मानवी नातेसंबंधांचा सूक्ष्म तरल पातळीवर वेध घेणारी लेखणी रोहिणी कुलकर्णी ह्यांना लाभली आहे.
अनलंकृत परंतु आशयाशी संवादी शैली हा त्यांच्या लेखनाचा विशेष आहे.साध्या साध्या प्रसंगातून, घटनांतून त्या कथेची वीण अशा रीतीने घट्ट करीत जाताना की, वाचक स्तिमित होऊन जातो.
'भेट आणि फलश्रुती'च्या सर्जनशील लेखिकेचा 'स्टारी नाइट' हा प्रस्तुत कथासंग्रह म्हणजे सुजाण वाचकांसाठी एक वेगळा सशक्त अनुभव ठरावा.