हा लेनिनचा वारसा - ‘बोल्शेविकांनी सत्ता काबीज करताना रशियात आपण लोकशाही प्रस्थापित करू असे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पाळले नाही. लोकशाहीऎवजी त्यांनी स्थापन केली ती आपल्या पक्षाची अधिकारशाही. लेनिनने या बाबतीत कोणाचेही ऎकले नाही. त्यामुळे स्टॅलिनच्या कारकिर्दीमध्ये रशियामध्ये जे काही घडले त्याला लेनिनच जबाबदार ठरतो. त्या वेळी रशियात स्टॅलिनऎवजी ट्रॉट्स्की, बुखरिन किंवा दुसरा कोणीही बोल्शेविक सत्तेवर असता तरीही असेच झाले असते. बोल्शेविकांची विचारप्रणाली आणि कार्यपध्दती यातूनच सर्व अनर्थाचा उद्भव घडून आला.’ - स्वेतलाना