भारत आणि फ्रान्स हे दोन देश तसे लांबलांबचे... ते जवळ यावेत, परस्परांचे मित्र व्हावेत, एकमेकांची संस्कृती समजून घेण्यासाठी दोन्ही देशांच्या नागरिकांनी यावं-जावं, भेटीगाठींतून सहकार्य-सामंजस्य वाढत जावं, यासाठी पुण्यात स्थापन झालं फ्रान्स मित्र मंडळ. त्या मंडळाची प्रतिनिधी म्हणून सुमारे चाळीस वर्षांपूर्वी निर्मला पुरंदरे नावाची एक तरुण कार्यकर्ती वर्षभरासाठी फ्रान्सला जाऊन राहून आली. देशाची अनधिकृत राजदूत म्हणून तिकडे वावरली. परदेशप्रवासातले नावीन्य ओसरलं नव्हतं, अशा वेळी त्या वास्तव्यात तिनं घेतलेल्या अनुभवांचं आणि केलेल्या निरीक्षणांचं हे प्रांजळ कथन...