सर आयझॅक न्यूटन असामान्य आणि बहुरंगी प्रतिभेचे स्वामी होते. त्यांचा जन्म इंग्लंडमधील लँकाशायर येथील एका सामान्य कुटुंबात झाला होता. आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर त्यांनी विज्ञानातील आश्चर्यकारक अशी उंची गाठली, तरी जीवनभर त्यांना संघर्ष करावा लागला. आयझॅक न्यूटन यांनी प्रकाश आणि त्यांच्या विविध रंगांचे विश्लेषण करून या जगाला विविध रंगांचे ज्ञान करून दिले असले, तरीही त्यांचे स्वत:चे जीवन मात्र रंगहीन होते. सागरात निर्माण होणार्या भरती-ओहोटीचे रहस्य त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेले.या पुस्तकात न्यूटनच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटना व संदर्भ, त्यांचा स्वभाव, व्यवहार व प्रवृत्ती याबाबत विस्ताराने वर्णन आहे. त्यांच्या शोधाविषयीही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.आयझॅक न्यूटन आपल्या काळातील सर्वांत मोठे व प्रतिष्ठित वैज्ञानिक होते. त्यांच्याबद्दल त्याकाळी म्हटल्या जाणार्या पुढील वाक्यांवरून त्यांच्या प्रसिद्धीचा अंदाज लावल्या जाऊ शकतो.निसर्ग अंधारात होता.निसर्गााचे नियम अंधारात होते.आणि आजूबाजूला प्रकाश पडला.न्यूटनने गुरूत्वाकर्षणाचा प्रसिद्ध सिद्धांत शोधला – ज्यानुसार पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्या केंद्राकडे ओढते. न्यूटनचा महान ग्रंथ्क ‘प्रिंसिपिया’ विश्वप्रसिद्ध आहे. ज्यात त्यांची गतीच्या नियमाची (Law of Motion) व्याख्या आहे. याशिवाय त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले.