भागवत म्हणजे कृष्णकथा. कृष्णाच्या काळ्यासावळ्या वर्णामध्ये ज्यांना सौंदर्य, चातुर्य आणि प्रेम दिसतं त्यांच्यासाठी तो श्याम आहे. श्याम प्रेम आणि कर्तव्य यात संतुलन साधणारा कर्तव्यदक्ष प्रेमी आहे. या पुस्तकात देवदत्त पट्टनायकांनी श्रीकृष्णाचं बहुआयामी आणि काहीसं गूढ व अतिशय सुंदर रीतीनं उलगडून दाखवलं आहे. या पुस्तकात कृष्णाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत, आनंदी स्त्रियांच्या सहवासातल्या दह्यादुधाच्या सुंदर जगापासून ते रक्तलांछित संतापी पुरुषांच्या क्रूर जगापर्यंत चढत जाणार्या कृष्णकथांची घट्ट वीण आहे.