मराठी ही आपली मातृभाषा. बालपणापासूनच आपण ही भाषा बोलत आलो आहोत. आतापर्यंत आपल्या या मातभाषेतील हजारो शब्दांचा परिचय आपणांस झालेला आहे. शाळेत शिकत असताना त्या शब्दांचे लेखन करायलाही आपण शिकलो आहोत. तरीही अनेक शब्दांचे लेखन करताना आपल्या हातून चुका घडत असतात.अशा चुका टाळण्यासाठी काय करावे व आपले लेखन शुद्ध व नेटके कसे करावे, यासंबंधी या पुस्तकात अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. या पुस्तकाचे मनापासून अध्ययन केल्यास शुद्धलेखन नक्कीच सोपे वाटेल. सर्व विदयार्थी व शिक्षकांनी अवश्य संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक.