उत्पादन माहितीवर जा
        
  
  
   
      
      
  
    - 
मीडिया गॅलरी  मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी
        1
         / 
        च्या
        1
      
      
    Shreemadbhagwat Aani Marathi Sant by S R Talghatti
                  
                    
                    
                      Description
                    
                  
                  
                
                Description
                    ‘श्रीमदभागवत महापुराण म्हणजे ब्रह्मसूत्रांचा विशद अर्थ, महाभारताचे निश्चित तात्पर्य, गायत्रीवरील विस्तृत भाष्य, वेदार्थाचा सुलभ विस्तार आणि सर्व पुराणांचे सार होय’ - असे भागवताचे स्वरूप-वर्णन गरूडपुराणात केले आहे. भक्तिदर्शनाचे प्रमुख प्रस्थान म्हणून भागवत प्रसिद्ध आहे. तथापि, भक्तिरसाप्रमाणेच ब्रह्मज्ञानामृताचाही सुवर्णकलश असल्याने ते जितके भक्तजनांना प्रिय आहे, तितकेच ज्ञानी परमहंसांनाही प्रिय आहे. अशा महान व लोकप्रिय पुराणातील तत्त्वज्ञानाचा परिचय प्रस्तुत ग्रंथात करून दिला आहे. चतु:श्लोकी भागवत, ईश्वरसंकल्पना, भागवतधर्म,स्तुतींमधील तत्त्वज्ञान, नवविधा भक्ती, नीतिशास्त्र, श्रीकृष्णावतार इत्यादी विषयांची त्यात तात्त्विक अंगाने चर्चा केली आहे. त्याबरोबरच ज्ञानेश्वर,नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या मराठी संतपंचकाच्या विचारांचा भागवतदर्शनाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या तात्त्विक अनुबंधाचा घेतलेला शोध हे या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. श्रीमदभागवत प्रतिपादित भागवतधर्माचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ती आहे, या वास्तवाकडे अभ्यासकांचे, उपासकांचे व जिज्ञासू वाचकांचे लक्ष वेधणे आणि भागवताचा अद्वैती ज्ञानभक्तीचा वारसा मराठी संतांनी कसा समर्थपणे पुढे चालविला आहे ते विशद करणे हे प्रस्तुत ग्रंथाचे प्रमुख प्रयोजन आहे. श्रीमदभागवत आणि मराठी संत यांनी समानपणे अद्वैती ज्ञानक्तिस्वरूप भागवतधर्माची जी विश्वकल्याणकारी शिकवण दिली आहे तिचे स्वरूप प्रस्तुत ग्रंथात विशद केले आहे.
                  
- नियमित किंमत
- Rs. 126.00
- नियमित किंमत
- 
        Rs. 140.00
- विक्री किंमत
- Rs. 126.00
- युनिट किंमत
- / प्रति
               -10%
            
          पिकअप उपलब्धता लोड करू शकलो नाही
शेअर करा

हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
 
    
      Shreemadbhagwat Aani Marathi Sant by S R Talghatti
  
 चरित्र - आत्मचरित्र
चरित्र - आत्मचरित्र
