साल १९९१. २१ मे ची रात्र. घडयाळात १० वाजून २० मिनिटं झालेली. ती तरूणी आदरानं झुकली. तिचा हात त्यांच्या पावलांच्या दिशेनं गेला... आणि अचानक कानठळया बसवणारा स्फोट झाला. धुराचे ढग विरले आणि समोर आला छिन्नविछिन्न मृतदेहांचा रक्तामांसाचा चिखल... ही आहे मन गोठवणारी कहाणी. थरारक पण उदास करणारी. राजीव गांधींना कोणी व का मारलं ? हे गूढ उकलण्यासाठी मग भारत सरकारनं पाचारण केलं, ते डी.आर. कार्तिकेयन यांना. त्यांच्या अथक परिश्रमाची आणि तपासाची ही कथा...