शिष्टाईचं अर्थात डिप्लोमसीचं विश्व म्हणजे जणू सप्तरंगी इंद्रधनूच. या विश्वाचे रंग, ढंग आणि विविध पैलू चार दशकांहून अधिक काळ दिल्लीत वास्तव्य असलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर आणले आहेत. या पुस्तकात जसा टागोर व मुसोलिनी यांच्या भेटीचा रोचक वृत्तान्त आहे, तसंच औपचारिक प्रसंगी िंकवा वाटाघाटी होताना गमतीशीर घटना कशा घडतात याचं खुमासदार शैलीत कथन आहे. अफगाणिस्तानसारख्या देशांत धोके पत्करून परदेश सेवेतील अधिकाNयांना गंभीर प्रसंगांना कसं तोंड द्यावं लागतं, याबद्दलचं विवेचन जसं आहे, तसंच जॉर्ज बुश आणि व्लादिमीर पुतिन या दोन नेत्यांमधल्या कडू-गोड संबंधांचं वर्णनही आहे. डिप्लोमॅटिक वर्तुळात दीर्घकाळ वावरणाNया एका मुरब्बी पत्रकाराने आपल्यासमोर धरलेला शिष्टाईच्या विश्वाचा वॅâलिडोस्कोप म्हणजेच... शिष्टाईचे इंद्रधनू ! ...