या कादंबरीत .वैशाली. या आधुनिक स्त्रीचे उत्कट चित्रण आहे. कॉलेजमधील ही प्राध्यापिका. आपले सुरक्षित आयुष्य झुगारून जनजाणिवेत सामील होते. पण आजूबाजूला सुरू असतं आपल्या संस्कृतिसंवर्धनाच्या नावाखाली ऐतिहासिक फंदफितुरीचं राजकारण. वर्चस्वासाठी स्वकीयांचा गळा कापण्याची कटकारस्थानं त्यातून ती मार्ग शोधते. या प्रतिकूल वातावरणाचे कौटुंबिक पातळीवर उमटणारे भावकल्लोळ पचवीत आव्हान स्वीकारते. जीवनातील अनेक स्तरांवरील संघर्षांना तोंड देत एखादी स्त्री कशी घडतवाढत जाते, याचं कलात्मक व वैचारिक दर्शन घडवणारी, वाचकाला आयुष्याविषयी अंतर्मुख करणारी ही अनोखी कलाकृती. ‘कुरूक्षेत्र काश्मीर’ आणि ‘बुद्धाचा तिसरा डोळा’ या दोन कादंबर्यांनंतरची प्रमोद वडनेरकर यांची ‘शरसंधान’ ही आशयसंपन्न कादंबरी.