आज प्रत्येक हुशार विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार संस्थांमधूनच शिक्षण पूर्ण करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. परिणामी या संस्थांच्या प्रवेश परीक्षांकरिता हे विद्यार्थी अगदी जिद्दीनं अभ्यास करीत आहेत. साहजिकच शालेय स्तरावरील म्हणजेच ८ वी ते १० वी गणित व विज्ञानाचा फाउंडेशन कोर्स आणि एनटीएसईच्या माध्यमातून त्याची तयारी करण्यास विद्यार्थी प्राधान्य देत आहेत.अर्थात दहावीपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांचे पुढचे करिअर निश्चित नसते. म्हणूनच त्यांना आयआयटी, एम्स, विज्ञान शाखेत शिक्षण व संशोधन, यूपीएससी, सीए असे असंख्य मार्ग खुले असावेत या दृष्टिकोनातून फाउंडेशन कोर्स आणि एनटीएसईची एकत्र तयारी करून घेण्यावर भर दिला जात आहे. किंबहुना अशी तयारी करून घेणाऱ्या क्लासेसकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा असतो.या पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक प्रज्ञावंत विद्यार्थ्याला आणि त्यांच्या जागरूक पालकांना या कोर्सेससंदर्भात इत्थंभूत माहिती मिळेल अशी खात्री आहे.