"सार्थ' म्हणजे व्यापार्यांचा तांडा. ज्या काळात या अर्थाने 'सार्थ' हा शब्द भारतात प्रचलित होता त्या सातव्या-आठव्या शतकात ही कादंबरी आपल्याला नेते. तारावती या नगरातला नागभट्ट हा मंडनमिश्रांच्या गुरुकुलात वेदाध्ययन केलेला, समवयस्क अमरूक नावाच्या राजाच्या विश्वासातला, नुकतीच पंचविशी ओलांडलेला. राजा अमरूक नागभट्टावर काही कामगिरी सोपवून त्याला एका 'सार्था' बरोबर देशांतराला पाठवतो अन् तिथूनच विविधरंगी अनुभवचक्रात नागभट्ट गोवला जातो. मध्ययुगातील अनेक सत्य अन् कल्पित घटनांद्वारे या कादंबरीचा पट घट्ट होत जातो. कुमारिलभट्ट, मंडनमिश्र, त्यांची पत्नी भारतीदेवी, शंकराचार्य इ. व्यक्तींच्या किंवा नालंदा विद्यापीठ, पूर्वेचे सूर्यमंदिर इ. स्थलांच्या कथा येथे गुंफून घेतलेल्या आहेत. या निरनिराळ्या ऐतिहासिक कथा ,या कादंबरीचा प्रवाह सखोल करीत राहतात व कथानकाचा भावकाळ तीव्रच करतात. यातूनच कादंबरीचा वाचक मध्ययुगीन जीवनशैलीच्या अद्भुत, विस्तीर्ण अनुभवसागरात थेट खेचला जातो. भारतीय कीर्तीचे सिद्धहस्त कन्नड लेखक डॉ. भैरप्पा यांच्या इतर कादंबर्यांप्रमाणेच 'सार्थ' ही कादंबरीही वाचकांना एका अजस्र, महाकाय अनुभवाला सामोरे जाण्यास भाग पाडते"