मानवी संस्कृतीच्या इतिहासात सर्प-नाग वा तत्सम जीवसृष्टीचे स्थान फार महत्त्वाचे आहेत. माणूस आणि साप यांच्या परस्पर संबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकांनी केला आहे. मात्र इथे सापांचं आणि प्रा. म. वि. दिवेकर यांचं नातं अतिशय मैत्रभावाचे आहे. ते वारुळात राहतात आणि साप त्यांच्या घरात राहतात असं म्हटलं तरी चालेल. ह्या सर्पसान्निध्यामुळे प्रा. दिवेकर यांना माणूस आणि सर्प यांच्या संबंधांतील अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला. विविध अनुभवांतून त्यांनी हे संबंध अधिक स्पष्ट केले आहेत. ह्या कथा सापांच्या आहेत, माणसांच्या आहेत, आजच्या आधुनिक जैवशास्त्राच्या आहेत, सापांसारख्या जीवांची असलेली भीती कमी करणार्या आहेत आणि वैज्ञानिक माहितीत भर घालणार्या आहेत.‘सर्पमित्र’ असलेल्या दिवेकरांच्या ह्या कथा अद्भुत आणि विलक्षण आहेत. वाचकांना त्या वेगळ्या अनुभवविश्वात घेऊन जातात.