संस्कृती, समाज आणि साहित्य यांचे परस्परसंबंध स्पष्ट करतानाच काही महत्त्वाच्या पाश्चात्त्य आणि पौर्वात्य विचारप्रवाहांची अभ्यासपूर्ण चर्चा येथे केली आहे.
प्रस्तुत ग्रंथात संस्कृती आणि साहित्य या संकल्पनांचे स्पष्टीकरण केले आहे, प्राचीन भारतीय संस्कृतीचे स्वरूप, सामर्थ्य आणि मर्यादा यांचा विचार केला आहे, तर पाश्चिमात्य आणि मार्क्सवादी विचारवंतांचे परिशीलन केले आहे. त्याप्रमाणेच चार मराठी कवी आणि चार मराठी कादंबर्यांतून सांस्कृतिक प्रभाव आणि परिवर्तनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्यापूर्वी ह्या अभ्यासविषयाची मराठी समीक्षेत ङ्गार कमी प्रमाणात चर्चा झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रस्तुत ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित होते.