पृथ्वीराज चौहानांवर लिहिण्याकरिता अभ्यासला सुरूवात केली तर जन्मस्थळापासून ते अंतापर्यंत ठायीठायी विसंगती समोर येऊ लागल्या. मग मागचे संदर्भ जुळवून पुढे घडणार्या घटनांशी त्यांचा मेळ बसविण्याची सर्कस करावी लागली. पृथ्वीराजचा शेवट लिहिताना खूपच मानसिक त्रास सहन करावा लागला.कधीही पराभूत न झालेला हा केवळ 26 वर्षे वयाचा तरुण सम्राट अनाथासारखा सिरसागडाचा पायथ्याची डोळे मिटून पडतो ही कल्पनाच मोठी क्लेशदायी वाटते. त्याच्या जीवावर जीव देणारा त्याचा मित्र चंदरवरदाईसुद्धा त्याच्या अंतसमयी त्याच्याजवळ नसतो. ही हृदय हेलावून सोडणारी बाब आहे.पृथ्वीराज वैर साधून जयचंदला काय प्राप्त झाले? फक्त दोघांचा विनाश आणि हिंदुस्थानची गुलामगिरी. ते दोघे एक झाले असते तर हिंदुस्थानकडे डोळा वर करून पाहण्याची परकीय शक्तींची हिंमत झाली नसती.