शारीरिक स्वच्छता आणि मानसिक शुद्धतेकरिता योगसाधना व प्राणायाम ही परिपूर्ण आणि महत्त्वाची एक जीवनपद्धती आहे. या यंत्रयुगात विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती, कार्यालयातील कर्मचारी, कारखाने-व्यापार-व्यवसायातील व्यक्ती यांना शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक शांती मिळणे अशक्य झाले आहे. यावर योगासन व प्राणायामाशिवाय दुसरा परिणामकारक उपाय उपलब्ध नाही. या पुस्तकात आसने, मुद्रा, बंध, शारीरिक बाह्य व आंतरिक स्वच्छता, चित्ताची एकाग्रता आणि प्राणायाम यांची सविस्तर माहिती आकृत्यांसह दिली आहे. डॉक्टरांना असाध्य अशा कित्येक आजारांवर योगासने व प्राणायाम उपयुक्त ठरू शकतात असा तज्ज्ञांचा दावा आहे. याची माहिती वाचकांना खचितच उपयोगी पडू शकते.