समीक्षेची वल्कले ही उपयोजित समीक्षा आहे. पण हे उपयोजन फक्त संबंधित साहित्यकृतीपुरते सीमित नाही.
या उपयोजनांमागे दीर्घ कलास्वाद आणि दृढ कलाशास्त्रीय चिंतन आहे म्हणूनच नवे साहित्यिक, समीक्षक, अभ्यासक यांना उन्नत वाङ्मयीन भान,वाङ्मयीन जाण आणि नवी निर्मितीप्रेरणा देण्याचे आश्वासन ह्या ग्रंथात आहे.
कवी म. म. देशपांडे यांच्या प्रकाशित, अप्रकाशित सर्व काव्यनिर्मितीवरील भाष्य हे याचे देखणे उदाहरण होय