नवअभिरुचीच्या साहित्याचे स्वागत करणे आणि गतअभिरुचीच्या साहित्याचे पुनर्मूल्यन करणे हे समीक्षेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते कुसमावती-मर्ढेकर-नेमाडे यांच्या साहित्यविचारांची आणि करंदीकर-श्याममनोहर आदींच्या साहित्यकृतींची समीक्षा करून देवानंद सोनटक्के या समीक्षकाने हे उद्दिष्ट अर्धे साधले आहे तर कोलटकर-ग्रेस-लोमटे यांच्या साहित्यकृतींवर भाष्य करून ते पूर्णत्वास नेले आहे देवानंद यांची समीक्षा तत्त्वदक्ष आहे पण तत्त्वग्रस्त नाही ती आस्वादातून तत्त्वांचा शोध घेते आणि साहित्यकृतीतील सूक्ष्म सुगंध परिसरात पसरविते समीक्षेने आणखी काय करायचे असते?