नारायण धारप यांची ‘समर्थ’ ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा…अशोक समर्थ हे एक प्रकारचे ‘पॅरानॉर्मल’ डिटेक्टिव्ह…सर्वसामान्यांना छळणाऱ्या दुष्ट व अघोरी शक्तींचा आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्याने ते पाडाव करतात.त्यांच्या डावपेचात ते भौमितिक आकृत्या, रिंगणं, धुपारे अशा सुरक्षासाधनांचाही वापर करतात…