हे पुस्तक म्हणजे पाठीमागील सेवाकालावधीतील विहंगलोकनाबरोबरच शेवटच्या कालावधीतील घटना सांगते. जसे अलीकडील एखादी घटना सांगत असताना त्या अनुषंगाने सर्व्हिसमधील पूर्वीच्या तशाच घटनेमध्ये डोकावून जात, त्यावेळची परिस्थिती व त्या घटनेला सामोरे जातानाची त्यावेळची माझी मन:स्थिती या पुस्तकातील बर्याच प्रकरणांत उमटली आहे.