उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Sahityavimarsha by Ramesh Warkhede

Description

साहित्यशास्त्रीय मर्मदृष्टीतून केलेले साहित्याचे रसग्रहण व मूल्यमापन हेया ग्रंथाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. या लेखसंग्रहात पुस्तक परीक्षण, स्फुटटिपणे आणि विवरणात्मक निबंध अशा त्रिविध स्वरूपाचे लेखनाचे आकृतिबंधआलेले आहेत. मराठीतील लयतत्त्वचर्चेपासून स्वतंत्र सौंदर्यशास्त्राच्यामागणीपर्यंत अनेक सैद्धांतिक प्रश्नांचा मागोवा घेणारे विवरणात्मक निबंध;शासन, साहित्य व समाज यातल्या अनुबंधांविषयीच्या वैचारिक चर्चा यापुस्तकात आलेल्या आहेत. लक्ष्मणशास्त्री हळबे, पु. शि. रेगे, प्रभाकर पाध्ये,भाऊ पाध्ये, गौरी देशपांडे, भारत सासणे, बाबा भांड इत्यादींच्या प्रायोगिकलेखनाची आंतर्ज्ञानशाखीय मूल्यदृष्टीतून केलेली चिकित्सा ही या पुस्तकाचीजमेची बाजू आहे. या ग्रंथातून साहित्याच्या अध्यापनाच्या दिशा,वाङ्मयेतिहासाच्या सुकाणूशास्त्राची मांडणी, भारतीय आणि पाश्चिमात्यसाहित्यशास्त्रातील संकल्पनांचे उपयोजन, तुकारामांपासून शिरवाडकरांपर्यंतमराठीतील साहित्यविचाराचे अन्वेषण अशा विविध विषयांवरच्या चर्चाविश्वाचेदर्शन घडते. आदिबंधात्मक समीक्षा, संज्ञापनविद्या, दास्यविमोचनात्मकज्ञानशास्त्र, जनवादी साहित्यशास्त्र, स्त्रीवादी समीक्षा अशा समीक्षेतील विविधप्रवाहांचे उपयोजन ही या समीक्षालेखांची खासियत आहे.ग्रंथलेखक रमेश नारायण वरखेडे यांचा महाराष्ट्राला अनुष्टुभचे संस्थापकसंपादक, धुळ्याच्या मराठी प्रगत अध्ययन संस्थेचे संस्थापक संचालक,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे संचालक, अनुदेशन तंत्रविज्ञान आणि विविध प्रकारच्यापाठ्यपुस्तक व अध्ययन साहित्याची निर्मिती करणारे शिक्षणतज्ज्ञ म्हणूनपरिचय आहे. यापूर्वी समाजभाषाविज्ञान, व्यावहारिक मराठी, संज्ञापनशास्त्र,भाषांतरविद्या, लोकसाहित्य, वृत्तपत्रविद्या इत्यादी विषयांवर त्यांचेलेखनसंपादन प्रसिद्ध झाले आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या भाषणांचेपाच खंडही त्यांनी विस्तृत प्रस्तावनांसह संपादित केले आहेत. त्यांच्या याआंतर्विद्याशाखीय प्रवासाचा आणि व्यासंगाचा पडताळा या लेखसंग्रहातूनहीमिळतो.
नियमित किंमत
Rs. 270.00
नियमित किंमत
Rs. 300.00
विक्री किंमत
Rs. 270.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Sahityavimarsha by Ramesh Warkhede
Sahityavimarsha by Ramesh Warkhede

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल