महाराष्ट्राच्या पारंपारिक समाज जीवनाची ओळख करून देणारे हे पुस्तक, ग्रामीण संस्कृतीचे योगदानही उलगडून दाखवते.आपल्या लोकसंस्कृतीच्या हरवत चाललेल्या खाणाखुणांची नोंद करतानाच लेखकाने सांस्कृतिक आणि समाजशास्त्रीय दृष्टीने मागची पिढी कशी जगत होती, त्यांचे जीवनाधार कोणते होते, त्यांची जीवनशैली कशी होती, यांची हा अस्सल दस्तऐवजच आपल्या हाती दिला आहे.
आजच्या परिवर्तनाच्या झगमगाटात लोकसंस्कृतीची प्रतिमा मलिन, अस्पष्ट आणि अंधुक झाली आहे. शिल्लक
आहेत, त्या तिच्या पाउलाखुणांचा हा घेतलेला सश्रद्ध मागोवा आहे.