सहज आणि अचूक’ इंग्रजी बोलण्यासाठी आणि भाषेतील गोडवा व्यक्त करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. कुठलीही भाषा प्रभावीपणे वापरायची तर त्यातली सुभाषिते, नवी शब्दकळा, नवे भाषिक प्रयोग यांची ओळख असायला हवी. या पुस्तकातील नवीन धाटणीची वाक्ये तुम्हाला तुमच्या भावना, तुमचे विचार इंग्रजीतून अधिक नेमकेपणानं व्यक्त करण्यास मदत करतील. इंग्रजीत वापरल्या जाणाऱ्या नवनव्या अभिव्यक्ती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य असून विविध प्रसंगांना उठाव देण्यासाठी चित्रांचा चपखल वापर करण्यात आला आहे.इंग्रजी भाषेचे असंख्य कंगोरे उलगडून दाखवणारे हे पुस्तक इंग्रजी बोलण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्वांचा विशेषत: ग्रामीण भागातील युवक-युवतींचा नक्कीच आत्मविश्वास वाढवेल.साकेत प्रकाशनमध्ये सहसंपादक व अनुवादक आकाशवाणी, औरंगाबाद (AIR) येथे नैमित्तिक उद्घोषक (Casual Announcer) एस.बी.ओ.ए. पब्लिक स्कूल, औरंगाबाद आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या किल्लेधारूर येथील महाविद्यालयात इंग्रजी अध्यापनाचा अनुभव