आपला कुठलाही धार्मिक उत्सव, कुठलाही समारंभ जेवणाखाण्याशिवाय पुरा होत नाही. आपण कुणाही आप्तेष्टांना किंवा स्नेही मंडळींना भेटलो की त्यांना जेवायचे आमंत्रण देतो. ह्या जेवणामुळे आपण आपली मैत्री दृढ करत असतो.खूप पदार्थ टेबलावर मांडलेले असतात, तेव्हा पाहुणे मंडळी पदार्थ पाहून तृप्त होतात. पाहुण्यांना किती अगत्याने बोलवले गेले आहे ह्याची जाणीव होते.पाहुणे अगदी तृप्त होतील अशा विविध पाककृती उदा. कोकणातील मेजवानी, दाक्षिणात्य-चिनी-गुजराथी-बंगाली मेजवानी, संक्रांत विशेष मेजवानी अशा अनेक रेसिपीज् लेखिकेने दिल्या आहेत.