आपले शरीर बांधेसूद असावे, आरोग्य उत्तम असावे असे प्रत्येक स्त्री-पुरुषास वाटत असते. परंतु ते साधायचे कसे?-स्वत:ची उपासमार करून घेऊन,-की न झेपेल इतका व्यायाम करून,-की फसवी अद्भुत औषधे घेऊन?आहारशास्त्राच्या अभ्यासक व दीर्घ अनुभव असलेल्या लेखिका वसुमती धुरू आपणास सर्व पर्यायांची माहिती देतात आणि सौम्य व्यायामाचे प्रकार, चालणे तसेच शास्त्रशुध्द सौम्य आहारनियमन कसे करावे? हे समजावून देतात. आहारनियमनाच्या विविध पाककृती देऊन लेखिकेने सिध्दांताला प्रात्यक्षिकांचीही जोड दिली आहे. या पुस्तकामुळे बांधेसूद, सुडौल राहण्याचे आपले इप्सित साधणे सोपे होईल.