ही गोष्ट आहे जपानमधील चिमुरड्या सादाकोची.दुसऱ्या महायुद्धात जेव्हा हिरोशिमावर पहिला अॅटमबॉम्ब टाकला, तेव्हा ती केवळदोन वर्षांची होती.नऊ वर्षांनी सादाकोला ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झाला.विनाशकारी बॉम्बच्या विषारी किरणांनी तिचं सुंदर, निरागस बालपण झाकोळलंआणि या गोड, गुणी, चुणचुणीत हसऱ्या सादाकोची मृत्यूशी झुंज सुरू झाली.चिझुको तिची वर्गातली मैत्रीण. सादाकोला भेटायला दवाखान्यात येते. एकसोनेरी कागद दाखवत सांगते, “आजारी व्यक्तीनं जर एक हजार कागदी बगळेतयार केले, तर देव त्याची इच्छा पूर्ण करतो, त्याला निरोगी बनवतो.” आणिसादाकोची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती उसळून येते.हसतमुखाने एक-एक कागदी बगळा बनविताना कॅन्सरशी चिवट झुंज सुरू राहते.या जिद्दी सादाकोचं पुढं काय होतं? ती वाचली काय?आज जगभर सत्तासंघर्षाच्या अभिलाषेनं आणि उग्र दहशतवादाच्या विध्वंसकप्रवृत्तीनं ग्रासलं आहे. जागोजागी हिंसक प्रकार डोकं वर काढीत आहेत आणियात सादाकोसारखे निष्पाप बळी जात आहेत.अशा वेळी विश्वमानवता, विश्वशांतीची आठवण करून देणाऱ्या सादाकोच्या शांतीस्मारकावरील ओळींचा संदेश आज वर्तमानाची गरज वाटू लागते.आमचा हा आक्रोश आहे,हीच आमची प्रार्थना,जगात या शांती लाभो !