सांगाती हा प्रवास आहे, कलावंतांच्या सर्जनशीलतेला कुर्निसात घालणारा. या विलक्षण पुस्तकात सदानंद कदम आपल्याला साहित्य, संगीत, चित्रकला अशा विविध कलाप्रकारातील अवलियांची भेट घडवतात. या कलाकारांच्या कलासक्त जाणिवांची रेखीव मांडणी करतात. अनेक किस्से, प्रसंग आणि आठवणींचा पट उलगडत जात हे पुस्तक जणू अनेक प्रतिभावंतांशीच आपली ओळख घडवतं. गोनीदां, कुसुमाग्रज, विंदा, ‘स्वामी’कारांपासून, वपु, सुशि, खेबूडकर, ‘मृत्युंजय’कारांपर्यंत सगळ्यांचं जिव्हाळपण सांगातीच्या शब्दाशब्दात उतरतं.