त्वचेविषयी सर्वांगीण मार्गदर्शन करणारं उपयुक्त पुस्तक आहे ‘फीड युवर फेस’ (रूप करा सुरूप). परदेशात ज्याच्या लाखो प्रती विकल्या गेल्या, अशा या पुस्तकात डॉ. जेसिका वू यांनी त्वचेची रचना, तिचे कार्य, अन्नाचा आणि त्वचेचा संबंध, मुरुमे, त्वचा रापवावी की रापवू नये, सुरकुत्या पडण्याआधी त्यांना प्रतिबंध कसा करावा, बळकट, आरोग्यपूर्ण केस आणि नखांसाठी घ्यायचा आहार, चेहऱ्याला पोषक आहार, चेहऱ्याचे अतिरिक्त पोषण, चेहऱ्याला लावण्याचे अन्नपदार्थ आणि वृद्धत्वातही डौलदार कसे दिसावे, इ. विषयी मार्गदर्शन केले आहे. उपयुक्त क्लृप्त्या, रुग्णांच्या सत्यकथा आणि त्यांचे आधीचे व नंतरचे फोटो यांचाही या पुस्तकात समावेश आहे.