वाचकाला पुढे नेत नेत ही कादंबरी अचानक धक्कातंत्राकडे वळते. कादंबरीतील पात्रांनाच नव्हे, तर वाचकांनाही हा सुखद धक्का समाधान देऊन जातो.
हे धक्कातंत्र विसंवादी नाही, त्याला एक पूर्वसूत्र आहे.
यासाठी लेखिकेने योजलेली पात्रे खरी आणि जीवनवादी वाटतात. सर्वच घटनांना काही कारण असतेच असे नाही, काही अकारणही असतात, पण त्यातूनच एक नवी कादंबरी आकाराला येत असते.
वाचकांना ही कादंबरी आवडेल ही अपेक्षा...