पाककलेवर आत्तापर्यंत जी पुस्तके लिहिली गेली आहेत, त्यांमध्ये रुचिपालट हे पुस्तक मोलाची भर घालणारी आहे. पुस्तकाची मांडणी साधी, सोपी आणि आकर्षक आहे. पदार्थांचे वेगवेगळे विभाग केले असल्यामुळे ,पाहिजे तो पदार्थ चट्टकन् काढून वाचता येतो व त्याची कृती करणे सोयीस्कर होते. या पुस्तकातील "थोडी पूर्वतयारी" व "घरगुती उपकरणे" हे दोन्ही विभाग अत्यंत उपयुक्त आहेत. विविध पदार्थाची मापे देताना, ती रोजच्या वापरातील परिमाणांची दिल्यामुळे पदार्थ तयार करायला सोपे वाटतील. थोडक्यात , संसारात नवीनच पदार्पण करणार्या युवकांना आणि गृहिणाना हे पुस्तक म्हणजे एक वरदानच ठरावे. - शांताताई किर्लोस्कर