विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे बंगाली साहित्यविश्वात आमूलाग्र बदल घडून आले. टागोर हे प्रतिभावान कवी, चित्रकार, कादंबरीकार आणि मोठे समाजसुधारक होते. त्यांना फक्त पुस्तकी शिक्षण पटत नसे, म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करण्यासाठी त्यांनी आश्रम व्यवस्थेवर आधारित एक शाळा ‘शांतिनिकेतनमध्ये’ सुरु केली. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या या असामान्य व्यक्तीचे हे प्रेरणादायी जीवनचरित्र !