देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांनी आपल्या काही जिवाभावाच्या सहकाऱ्यांसह संगीतशिक्षण आणि संगीतप्रसारासाठी एक रोपटं लावलं. भास्करबुवांच्या पुण्यप्रभावानं त्यांच्या मांदियाळीत सामील झालेल्या अनेकांनी या रोपट्याचं संवर्धन केलं. दिसामासानं वाढत या वृक्षानं शंभरहून अधिक पावसाळे पाहिले. त्याच्या संगीतछत्राखाली किती तरी स्वर आणि सूर निनादले, लय आणि ताल विसावले. या वृक्षाच्या विस्तारकार्यात देवगंधर्वांच्या पुढच्या पिढ्यांनी भक्कम योगदान दिलं अन् वर्तमान पिढी आजही पूर्णांशानं कार्यरत आहे. महाराष्ट्रभर पस्तीस शाखांनी समृद्ध झालेली ही संस्था म्हणजे एक नांदतं-गाजतं संगीतविद्यापीठ. गेली एकशे दहा वर्षं अखंड झंकारणाऱ्या या संगीतसंस्थेच्या समग्र प्रवासाचा वेध घेणारा ग्रंथ : पुणे भारत गायन समाज
एक सुरेल स्वरयात्रा.