उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Laxmanresha Atmacharitra By Ashok Jain R K Laxman

Description

'व्यंगचित्रात भारतीय माणसं दाखवायची म्हणजे आर. के. लक्ष्मण यांना मोठा जमावच काढावा लागे. गुजराती, मराठी, केरळी, बंगाली, मद्रासी, पंजाबी अशी वेगवेगळया चेहरेपट्टयांची, पोशाखांची माणसं काढायला वेळ लागे. व्यंगचित्र सादर करण्याची वेळ गाठण्यासाठी हळूहळू या जमावातील एकेक मंडळींना लक्ष्मण चाट देऊ लागले. अखेर एकच जण उरला. टक्कल असलेला, फुगीर नाकाचा, आखूड मिश्यांचा, धोतर व चौकडीचा कोट घातलेला आणि सदोदित चेह-यावर भांबावून गेल्याचे भाव असलेला सामान्य माणूस (कॉमन मॅन). या देशातील कोटयावधी मूक जनतेचं प्रतिनिधित्व तो करू लागला. लक्ष्मण यांच्या या आत्मकथेत त्यांचीही अवस्था कधी कधी या सामान्य माणसासारखी होते. कधी त्यांच्या व्यंगचित्रात आकडे लपले आहेत, असं समजून सट्टा खेळणारा व्यापारी त्यांना येऊन भेटतो, कधी न्यूयॉर्कमधील पार्क अॅव्हेन्यू भागात ते रेनकोट घेऊन गेल्यानं त्यांना चुकून मेक्सिकन समजलं जातं, तर एकदा मद्य पार्टीनंतर एवढी गाढ झोप त्यांना लागते की, आयुष्यातला एक दिवस कोरा दिवस ठरतो! जीवनाच्या कॅनव्हासवर लक्ष्मण यांनी रेखाटलेली शब्दचित्रं, टिपलेल्या घटना त्यांच्या व्यंगचित्रांइतक्याच मिश्कील, खटयाळ, खुसखुशीत आणि खुमासदार आहेत. उपहास, विडंबनाचा सूर पकडत जाणारी आणि सदोदित तजेल्याचं वरदान लाभलेली ही लक्ष्मणरेषा. 
नियमित किंमत
Rs. 203.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 203.00
-0%
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Laxmanresha Atmacharitra   By Ashok Jain  R k Laxman
Laxmanresha Atmacharitra By Ashok Jain R K Laxman

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल