जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ हा मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणून ओळखलाजात असला, तरी त्याच्याबद्दल अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत.मराठ्यांचे राज्य लयाला गेल्यानंतरच्या काळात सातारला त्याने बजावलेलीप्रशासकीय कामगिरी तर दुर्लक्षितच राहिलेली आहे.या पाश्र्वभूमीवर खुद्द इंग्लंडमधील अस्सल कागदपत्रांचा धांडोळा घेऊनलिहिलेले हे त्याचे चरित्र खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठ्यांचा इतिहासलिहिण्यामागच्या डफच्या मूळ प्रेरणा, तो इतिहास लिहिताना त्यालाआलेल्या अडचणी, साधनसामग्री गोळा करण्यासाठी त्याने घेतलेले अपारकष्ट आणि तरीही प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना इतिहासकार म्हणूनत्याच्या लेखनाला पडलेल्या मर्यादा व राहिलेल्या उणिवा… हे सारे काहीस्पष्ट प्रकाशझोतात आणणारे हे चरित्र मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आस्थाअसणा-या सर्वांनीच अवश्य वाचले पाहिजे.