हौस , शिस्त आणि साहस यांनी जर हातात हात घालून एकत्र प्रवास केला तर त्यातून मिळणारा आनंद काही विरळाच … ! मंदार ठाकुरदेसाई यांच्या हौरोची गोष्ट म्हणूनच वेगळी ठरते . सुपरबाइक्सच्या आवडीला त्यांनी प्रोफेशनल बाइकिंगची जोड दिली आवड व हौस ते साहस … आणि साहस ते ध्येयपूर्ती हा त्यांचा प्रवास सुपरबाइक्स इतकाच सुपर ठरला . कमी पल्ल्यांच्या मोहिमांपासून थेट काश्मीर ते कन्याकुमारी अशा थरारक मोहिमा करत त्यांनी सुपरबाइक्सवरुन एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला . वयाच्या पंचेचाळीशीपासून सुरू केलेल्या या धाडसी मोहिमांनी त्यांना आनंद तर दिलाच पण सोबत शिस्त , नियोजन कौशल्य , समयसूचकता आणि मित्र परिवार अशा बऱ्याच काही गोष्टीही ह्या मोहिमांतून त्यांना मिळत गेल्या . हौसेला मोल नसतं आणि वयाचं बंधनही नसतं असा आत्मविश्वास देणारं पुस्तक लिव्ह टू राइड !