उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Maze Rangprayog By Ratnakar Matkari

Description

१४ फेब्रुवारी २०१५ रोजी, रत्नाकर मतकरी यांच्या साहित्य-कारकिर्दीला६० वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत, त्यांनी ‘गूढकथा’ हा वैशिष्टयपूर्णकथाप्रकार मराठी साहित्यात रुजवला; त्याशिवाय, कादंब-या, ललितलेखसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, बालकथा, बालगीते, असे नाना प्रकारचेदर्जेदार आणि वाचकप्रिय लिखाणही केले. मात्र या लेखनप्रपंचासोबतचत्यांनी मुलांसाठी व प्रौढांसाठी जी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके(७५च्या आसपास) लिहिली, ते त्यांचे, मराठी साहित्याला आणिरंगभूमीला, भरभक्कम योगदान म्हणावे लागेल! विविध विषयांवरच्या,भिन्नभिन्न शैलीतील, विचारसंपन्न आणि रंगतदार, अशा या नाटकांच्या लेखनाबरोबरच मतकरींनी दिग्दर्शन, नेपथ्य-रंगभूषा-वेषभूषा इत्यादींचेसंकल्पन, अभिनय, निर्मिती अशा रंगभूमीच्या सर्वच शाखांमधून संचारकेला. या दीर्घ रंगप्रवासात त्यांनी नाटयक्षेत्रातील समस्यांचा, आणित्याहीपेक्षा सखोल अशा, रंगभूमीच्या मूलभूत प्रश्नांचा सातत्याने विचारकेला. त्या संदर्भातील त्यांचे सविस्तर विश्लेषण, हा ‘माझे रंगप्रयोग’चागाभा आहे. रंगभूमीच्या वाढीसाठी अपरिहार्यपणे कराव्याशा वाटलेल्याप्रयोगांचे हे तपशीलवार सत्यकथन, लेखकाच्या ओघवत्या नाटयपूर्णशैलीमुळे एखाद्या कादंबरीसारखे वाचनीय झालेले आहे. अनेक छायाचित्रांनीपरिपूर्ण असे हे पुस्तक रंगभूमीच्या अभ्यासकाप्रमाणेच, सर्वसामान्यरसिकालाही, संग्रही ठेवावे, असेच वाटेल! – इट्स अ कलेक्टर्स आयटेम !
नियमित किंमत
Rs. 720.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 720.00
-0%
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Maze Rangprayog   By Ratnakar Matkari
Maze Rangprayog By Ratnakar Matkari

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल