'डॉ. गोविंद स्वरूप हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक. कल्याण येथे प्रायोगिक रेडिओ दुर्बीण उभारून त्यांनी भारतात या शास्त्राचा श्रीगणेशा केला. पुणे जिल्ह्यामध्ये खोडद या गावी त्यांच्या पुढाकाराने रेडिओ दुर्बिणींचे संकुलच उभारण्यात आले. मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय ठरलेला आहे. भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचा लौकिक जगभर नेणारे उमदे आणि उत्साही शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचा हा परिचय. '