जसजसा वयाचा काटा पुढं पुढं सरकतो. तसतशा जुन्या आठवणी.जुने दिवस, प्रसंग, मित्रपरिवार मनात गर्दी करू लागतात.‘कुठून, केव्हा, कशी सुरुवात झाली आणि आज तू कुठवरआला आहेस?’ याचा स्वत:साठी का होईना.ताळेबंद मांडावासा वाटतो.
माझं स्वत:चं आयुष्य फार काही सरळ रेषेत, नाकासमोरच्यारस्त्यानं गेलेलं नाही. कला, साहित्य, शिक्षण, समाजकारण अशाआवडीच्या क्षेत्रांत मुक्तपणे वावरणारा मी कोणी एक ‘अमकातमका’!मधल्या फळीतला खेळाडू. खेळाचा मनमुराद आनंद घेतहार-जितीची पर्वा न करता, असेल त्या मैदानावर खेळ करणारासीधासाधा खेळीया.
आयुष्याच्या ओबडधोबड वाटांवरून चालताना अनेक व्यक्तिंचाजिव्हाळा, स्नेह मला लाभला. अनेकांनी माझ्या इवल्या पंखांनाआकाशात उडण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. माझं आयुष्यश्रीमंत, समृद्ध केलं; त्याचीच ही रामकथा!
जेथे जेथे गेलो जमविले आप्तखेळुनिया मुक्त रमलो मी