शाळेमध्ये 'विज्ञान' हा विषय 'अभ्यासा'चा असतो. या पुस्तकात हाच विषय 'छंद' म्हणून येतो. निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं. मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं. विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक केवळ 'शालेय' विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या 'शिक्षकां'साठी आणि शिक्षकांमधल्या 'पालकां'साठीही आहे.