'हा प्रवास आहे जगभराचा. अनेक स्थळं प्रसिध्द-अप्रसिध्द. पर्वत अन् सागर. अरण्यं अन् उद्यानं. नद्या, तळी, दरीखोरी. शहरं, गावं, खेडी. घरं, नाटयगृहं, अगदी स्नानगृहं अन् स्वच्छतागृहंसुध्दा ! आणि ही सारी ठिकाणं आपल्याला नुसती दिसत नाहीत, तर ती आपल्याला भेटतात, आपल्याशी बोलतात. कारण या ठिकाणांकडे जाताना आपल्यासवे आहे. एक संवेदनशील, रसिक मन, एक विवेकी जागरूक व्यक्तिमत्त्व. भेटलेल्या प्रत्येक स्थळाला एक अंगभूत व्यक्तिमत्त्व बहाल करणारी समृध्द ललितकृती -