निबंधलेखन ही एक कला आहे. भाषा हे या कलेचे माध्यम आहे आणि आपले अवघे अनुभवविश्व म्हणजे तिची सामग्री आहे. निबंधलेखन हे आपल्या मनातील विचार, आपले मत, अनुभव, भावना सुसंगतपणे, प्रभावीपणे व्यक्त करण्याचे साधन होय. मात्र अनेक विद्यार्थी निबंधलेखन, पत्रलेखनाच्या हक्काच्या मार्काना मुकतात. अशा प्रकारच्या लेखन प्रकारांना घाबरतात. या प्रकारच्या प्रश्नांना आता तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. । तुम्ही या पुस्तकाच्या मदतीने निबंध, पत्र, सारांश, गद्यलेखन अशा लेखन प्रकारांवर प्रभुत्व मिळवू शकाल. प्रस्तुत पुस्तकात निबंधाच्या विविध प्रकारांचे नमुने दिले आहेत. तसेच पत्र, सारांश, गद्य, वृत्तांत, जाहिरात लेखन इत्यादी सोदाहरण स्पष्ट केले आहे. इयत्ता ५वी ते १०वी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असे पुस्तक; तसेच शिक्षकांसाठीही परिपूर्ण असे हे मार्गदर्शक पुस्तक आहे.