निरोगी आयुष्य जगण्यासाठीचा सर्वांत महत्त्वाचा मंत्र म्हणजे प्राणायाम आणि योगासने होय. जीवनाचे यथायोग्य ठिकाणी योग्य मात्रेत नियमन करणे म्हणजे `प्राणायाम’ होय. प्राणायामाचे एकूण आठ प्रकार, त्यांची योग्य पद्धत, होणारे लाभ, सावधगिरी अशा सर्व गोष्टी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच षट्वर्मे, प्राणायामपूरक आसने, मुद्रा, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधान या क्रियांचाही यात समावेश करण्यात आला आहे.