फार पूर्वी भारतात लहान-मोठे राजे राज्य करीत होते. या राजांच्या पदरी अनेक गुणी, बुद्धिमान माणसं होती. अनेकदा काही विचित्र पद्धतीच्या न्यायनिवाड्याचं काम राजांसमोर येत असे. अशावेळी ही गुणवान माणसं आपल्या बुद्धीच्या जोरावर कसा छान, योग्य निवाडा करीत, ते समजण्यासाठी वाचायलाच हव्यात या चातुर्यकथा!