“पुस्तक उघडा आणि कुठूनही वाचण्यास आरंभ करा, तुम्हाला सापडेल मानसिक आधार आणि तुम्हाला आवश्यक असणारी प्रेरणा.”– द सायकोलॉजिस्ट
एक मानसोपचार तज्ज्ञ असणारे नॉर्मन व्हिन्सेन्ट पील हे आंतरराष्ट्रीय विक्रीचा उच्चांक गाठणाऱ्या अनेक पुस्तकांचे निर्माते व ख्यातनाम लेखक आहेत. त्यांनी ‘पॉवर थिंकिंग’ या पुस्तकातून जीवनातील वादळी आणि संकटांच्या प्रसंगी ताठ उभे राहण्याची प्रेरणा देणाऱ्या महान विचारांचा संग्रह वाचकांसमोर मांडला आहे. बायबल ते शेक्सपिअर, इमर्सन आणि वर्डस्वर्थपासून, टागोर आणि निजामीपर्यंत सर्वांच्या लिखाणातील तेजस्वी विचारकण उचलून या पुस्तकात एकत्र केले आहेत. त्यामुळेच या पुस्तकात वाचकांचे उन्नयन करणारे आणि प्रत्येक वाचकाला मनःशांतीकडे आणि एक उत्साही, परिपूर्ण जीवनाकडे बोटाला धरून घेऊन जाणारे ज्ञान यात आहे.शतकातील एक महान स्फूर्तिदायक लिखाण करणारा लेखक!