आपल्या पोटात कावळे असतात की आतडी?
आणि पोटात जर कावळे नसतील, तर भूक लागल्यावर
पोटातले कावळे ओरडतात असं आजी म्हणते, त्याचा अर्थ काय बरं असेल?
फुलपाखराचं पोट कसं असतं आणि हत्तीचं कसं?
पक्षी उडता-उडता जेवतात, तर आपण चालता-चालता का नाही जेवू शकत?
कीटक फुलांमधला मध खातात, पण काही-काही फुलंच या कीटकांना खाऊन टाकतात म्हणे!
मैत्रेयीच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तर आजीला आणि आजोबांनाही माहीत नसतात.
मग आजी आजोबांना म्हणते, “तुम्ही आता कॉम्प्युटर का शिकून घेत नाही?
त्याच्या पोटात जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठेवलेली असतात म्हणे !”