प्रघात उल्लंघून जाणारी कविता समकालीन वाङ्मयीन अभिरुचीला आव्हान देत असते. ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ ही मर्ढेकरांची कविता अशीच ललकारी देणारीनिर्मिती आहे.
मग एस्. एस्. नाडकर्णी यांच्यासारखा साहित्यसंशोधक काय स्वस्थ बसतोय! त्यांनी ‘पिपांत’वरील सर्व समीक्षालेख, चर्चा-पत्रे असे सारे साहित्य संकलित केले, विवेचनपर प्रस्तावनालेख लिहिला.
एक मोलाचा स्रोतग्रंथ मर्ढेकरशताब्दीच्या मुहूर्तावर मराठी रसिकांच्या ग्रंथसंग्रहात समाविष्ट केला.
- द. भि. कुलकर्णी