आयुष्याच्या एका उदात्त क्षणी भेट होते , तिचे रुपांतर जन्मोजन्मीचा सोबतीपणाच्या निश्चयात होते . परंतु नियतीने काही वेगळेच ठरविलेले असते . दोन भिन्न दिशांना दोघांचा प्रवास होतो . एका अश्याच क्षणी पुन्हा हे दोन्ही रस्ते भेटतात . परंतु त्यावेळी भावनेचा ओलेपणा आटून गेलेला असतो आणि पुढचा रस्ता धुसर दिसतो . अश्या कसोटीच्या वेळी एवढेच सांगता येते. ….
फिरुनी नवी जन्मेन मी . एका समाजकार्य करणाऱ्या ध्येयवेड्या स्त्रीची हि जीवनकथा व्यक्त करणारी कादंबरी वाचकांना भावोत्कट करते आणि मनाला हुरहूर लावते .