रवींद्र ठाकूर हे नाव आता चोखंदळ मराठी वाचकाला
अपरिचित राहिलेले नाही. कविता, कादंबरी, नाटक इत्यादी साहित्यप्रकारांमध्ये आणि मराठी साहित्याच्या समीक्षेतही
लक्षणीय भर घालणारी त्यांची लेखनसंपदा
आपल्या परिचयाची आहे.
उपरोक्त लेखन करताना त्यांनी वेळोवेळी अनेक कथाही
लिहिल्या आणि त्या-त्या वेळी त्या हंस, प्रतिष्ठान, उगवाई
इत्यादी नियतकालिकांतून प्रकाशितही झाल्या.
त्याचेच संकलन म्हणजे ‘पीळ आणि इतर कथा’ हा संग्रह होय.
या संग्रहातील अनेक कथांमधून शिक्षण आणि साहित्यक्षेत्र
या विषयाशी संबंधित जीवनानुभवांचे आविष्करण आढळून येते. आशय आणि विषयासोबतच आविष्कृतीचे निराळेपण
जोपासणारी ही कथा मराठी साहित्याच्या क्षेत्रात
आपल्या वेगळेपणाने उठून दिसेल, यात शंका नाही.